Thursday, July 04, 2024 11:13:26 AM

monsoon-returns-to-the-state
राज्यात मान्सूनचे पुनरागमन

राज्यात मान्सूनचे पुनरागमन

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून यामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी ऊन वाढले आहे. दरम्यान, मॉन्सूनचे पुनरागमन कधी होणार या बाबत हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. पुणे हवामान विभागाचे अनुराग काश्यापी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात १७ ऑगस्ट पासून पाऊस अंशत: सक्रिय होणार असून विदर्भ, मराठवाडा, कोकणात काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारली आहे. जुलै महिन्याच्या ३१ तारखेला पावसाने विश्रांती घेतली ती आजतागायत कायम आहे. मात्र, लवकरच पाऊस कमबॅक करणार आहे. कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १७ ऑगस्ट नंतर  मान्सून सक्रिय होणार आहे. हा मान्सून अंशत: सक्रिय राहणार आहे. हळूहळू R/F क्रियाकलाप वाढणार असून यामुळे विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात. मेघगर्जनेसह तीव्र ते अतितीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १९ ते १९ ऑगस्ट पासून राज्यात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या काही भागांवर मेघगर्जनेचे ढग असून त्यात पुणे नाशिक आणि सातारा, मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. या भागात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातील काही भागात होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाराज्यात मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर आणि नांदेड याच जिल्ह्यात पवसाने दमदार हजेरी लावली. तर उर्वरित जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला आहे. तर सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.ऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री