Thursday, July 04, 2024 10:28:20 AM

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे

पुणे, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील कोंढवा परिसरामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्टच्या रात्री एका बांधकाम साइटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांनी'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. कोंढवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. दोन व्यक्ती या शाळा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव काय? हे कुठे राहतात याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी देखील पुण्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केले होते.


सम्बन्धित सामग्री