Thursday, July 04, 2024 09:38:02 AM

wr-to-convert-49-mumbai-local-train-services-to-15-coach-from-august-15
रेल्वेची विरारकरांना स्वातंत्र्यदिनी खास भेट

रेल्वेची विरारकरांना स्वातंत्र्यदिनी खास भेट

रेल्वेने विरारकरांना स्वातंत्र्यदिनी खास भेट दिली आहे. या भेटीमुळे वसई - विरार भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मुंबई - ठाणे पट्ट्यात नोकरी आणि वसई - विरार पट्ट्यात घर असलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. यामुळे वसई - विरार मार्गावरील जाणाऱ्या तसेच येणाऱ्या गाड्यांना अनेकदा प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने वसई - विरार पट्ट्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी १५ डब्यांच्या अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून ही १५ डब्यांच्या गाड्यांची अतिरिक्त सेवा सुरू झाली आहे. वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १९९ वर पोहोचली आहे. रेल्वे प्रशासनाने स्वातंत्र्यदिनापासून ४९ फेऱ्या या १२ ऐवजी १५ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वाधिक १९ फेऱ्या अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान धावणार आहेत. वाढवलेल्या ४९ फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १९९ झाली आहे. पश्चिम रेल्वेने २००९ मध्ये दादर ते विरार १५ डब्यांची लोकल सुरू केली. दोन वर्षांनंतर म्हणजेच जानेवारी २०११ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर अंधेरी ते विरार दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी ७० कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यात १४ स्थानकांतील २७ फलाटांची लांबी वाढवण्यात आली. याचा फायदा झाला असून, यामुळे १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. १५ डब्यांच्या वाढीव फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान १९ फेऱ्या वाढविण्यात आल्या. त्याचबरोबर बोरिवली ते विरार दरम्यान ११ फेऱ्या, अंधेरी ते वसई दरम्यान ७ फेऱ्या, बोरिवली ते नालासोपारा दरम्यान २ फेऱ्या, दादर ते विरार दरम्यान ४ फेऱ्या तर चर्चगेट ते विरार दरम्यान २ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच बोरिवली ते वसई रोड, अंधेरी ते भाईंदर, नालासोपारा ते अंधेरी, भाईंदर ते विरार दरम्यान प्रत्येकी १ फेरी वाढविण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री