Sunday, June 30, 2024 10:17:11 AM

shocking-incident-at-chhatrapati-shivaji-maharaj-hospital-in-thane
एका रात्रीत १७ रुग्ण दगावले?

एका रात्रीत १७ रुग्ण दगावले

मुंबई, १३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावले आहेत. या रुग्णालयातील ही दुसरी घटना घडली आहे. ढिसाळ कारभार वारंवार समोर येऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर आता रूग्णालय व्यवस्थापनाने पत्रकार परिषद घेत खुलास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचे डीन यांनी पत्रकार परिषेद घेऊन या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, गेल्या चोवीस तासांमध्ये १८ पेशंटचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच रूग्णांना ताप, दम लागणे आणि फुप्फुसांचा संसर्ग असे व्याधी होते. यापैकी एका रूग्णाला ६ हजार ब्लेडप्लेट्स होते. असे अत्यावस्थ रूग्ण आमच्याकडे येतात. अशा रुग्णांवर आम्ही उपचार केले आहेत. एका पेशंटचा अल्सर फुटला होता. एका रूग्णाने केरोसीन प्यायलं होतं,चार वर्षाचा मुलगा आहे. पण नाही वाचवू शकलो." "पाचशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळजवळ सहाशे रूग्णांना अॅ़डमिट केले आहेत. आम्ही यथाशक्ती काम करत आहोत. कर्मचारी २४ तास- ३६ तास काम करत आहेत. आम्ही कोणत्याही पेशंट्सना नाकारत नाही. इकडे येणारे रूग्ण गरीब असतात. आम्ही कसंही करून त्यांना दाखल करतोच. काही लोक पैसे नसताना येतात, काही अत्यावस्थ स्थितीत येतात. जेवढ आमच्याकडून करायचं आम्ही ते करत असतो. ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. त्यामुळं जिल्हा रुग्णालयाचा भार कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर टाकण्यात आला आहे. ठाण्यासह पालघर आणि अन्य जिल्ह्यातील नागरिक कळव्यातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्याने डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री