Wednesday, October 02, 2024 10:57:53 AM

dombivli-motha-gaon-to-mankoli-bridge-will-be-open-for-public
डोंबिवली : मोठा गाव - माणकोली पुल लोकांसाठी होणार खुला

डोंबिवली  मोठा गाव - माणकोली पुल लोकांसाठी होणार खुला

डोंबिवली, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : डोंबिवली येथील मोठा गाव ते माणकोली या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पूल यंदाच्या दिवाळीपर्यंत नागरिकांसाठी खुला होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मोठा गावकडे जाणाऱ्या रेल्वे फाटकावरील पुलाच्या कामाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाचे कंत्राट काढण्याचे काम झाले आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री