Sunday, June 30, 2024 09:52:54 AM

five-patients-died-in-chhatrapati-shivaji-maharaj-hospital-in-thane
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्ण दगावले

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्ण दगावले

ठाणे, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास झाले. पण मृतदेह तशाच अवस्थेत अतिदक्षता विभागात पडून होता. या रुग्णालयात एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब पण समोर आली आहे. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आव्हाड यांना संताप अनावर झाला. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले. https://youtu.be/SFTbHjbXNGA


सम्बन्धित सामग्री