Sunday, July 07, 2024 02:50:16 AM

glowing-alambi-or-fungi-bioluminescence-found-in-sindhudurg-district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली चमकणारी अळंबी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली चमकणारी अळंबी

सिंधुदुर्ग ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेनं नटलेला जिल्हा आहे. आता यामध्ये आणखी एक भर निसर्गाने टाकली आहे, ती म्हणजे चमकणारी अळंबी. चमकणारी अळंबी ही देशात प्रथम केरळ राज्यात आढळली होती. त्यानंतर दुसरी नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ बायोलुमिनिकन्स फंगी म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे. जगभरात अळंबीचे एक हजार प्रकार आहेत. त्यामध्ये केवळ ७५ प्रकारच्या अळंबी या चमकणाऱ्या अळंबी आहेत.


सम्बन्धित सामग्री