Thursday, July 04, 2024 09:45:12 AM

nomadic-tribe-childrens-school
भटक्या जाती जमातीच्या मुलांची शाळा

भटक्या जाती जमातीच्या मुलांची शाळा

हिंगोली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: हिंगोलीतल्या वसमत मध्ये शांती नगरातील गारुडी, मदारी, नंदीवाले,वडार अनेक समाज गेल्या अनेक वर्षापासून पालात येथे राहत आहेत. तसेच येथील नागरीक शेकडो वर्षापासून शिक्षणापासून तर वंचित आहेत. त्यांचे गाव कुसाबाहेर असल्यामुळे त्यांना शासनाच्या कोणत्याही सुविधा अद्याप मिळाल्या नाहीत आहेत. अशातच देवदूत म्हणून अवतरले एक शिक्षक शामराव रावले हे बाल रक्षक शिक्षक असून ते तालुक्यातील सातेफळ येथील दीनानाथ मंगेशकर या शाळेवर शिक्षक आहेत ते गेल्या अनेक वर्षापासुन दररोज या पालावरील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. शामराव रावले हे दररोज पल्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.


सम्बन्धित सामग्री