Saturday, July 06, 2024 11:45:11 PM

maratha-march-in-chhatrapati-sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्ट २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बुधवारी पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा निघाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील ज्या क्रांती चौकातून २०१६ पहिला मोर्चा निघाला होता, तेथूनच पुन्हा बुधवारी मराठा क्रांती मोर्चा निघाला. मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता. यावेळी शेकडो विध्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. २०१६ करण्यात आलेल्या एकूण १५ मागण्या पैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी छत्रपती संभाजीनगरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे, मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले.    


सम्बन्धित सामग्री