Saturday, October 05, 2024 03:17:30 PM

मुंबई विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मुंबई आणि दिल्ली डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला काल दुपारी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. काल दुपारी मुंबई आणि दिल्ली डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार अशी धमकी देण्यात आली होती. कंट्रोल रुमला फोन करत विमानतळ परिसरात बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार असल्याची माहिती आरोपीने दिली होती. यानंतर या दोन्ही विमानतळावर शोध घेतला असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. दरम्यान यानंतर मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कलम ५०६(२) आणि कलम ५०५(१) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री