Saturday, July 06, 2024 11:14:09 PM

shirdi-nagar-panchayat-set-up-a-garden-worth-2-5-crores-for-devotees
शिर्डी नगरपंचायतने भाविकांसाठी उभारले अडीच कोटीचे गार्डन

शिर्डी नगरपंचायतने भाविकांसाठी उभारले अडीच कोटीचे गार्डन

शिर्डी, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: शिर्डी साईबाबा मंदिराच्या चार क्रमांक गेट समोरील नगरपंचायतचा जागेत शिर्डी नगरपंचायतच्या वतीने तब्बल अडीच कोटी रुपयांचे गार्डनसह यात साईबाबांचे देखावे उभारले आहे. साईबाबांचा मंदिरात साजरे करण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्सवा दरम्यान साईबाबांचा रथाची मिरवणूक शिर्डी नगरपंचायतच्या या गार्डन जवळून जाते. त्याच बरोबर साईबाबांची दर गुरुवारी निघणारी पालखीही या मार्ग जाते. त्यामुळे या गार्डनला श्री साई पालखी गार्डन असे नाव देण्यात आले आहे. साईबाबा वृक्षांना पाणी देतांना, दिवे लावतांना , साईबाबांची पालखी निघाली, असे भव्य दिव्य देखावे या गार्डनमध्ये असुन 21 फुट उंच अशी साईबाबांची मूर्ती देखील या गार्डन मध्ये बसवण्यात आली असल्याचं यावेळी शिर्डी नगरपंचायतचे मुख्यअधिकारी सतीष दिघे म्हणाले आहे. या गाडर्नचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या एक ते दिड महिन्यात हे श्री साई पालखी गार्डन भाविकांनासाठी खुलं होणार असल्याचही दिघे म्हणाले.येणाऱ्या एक ते दीड महिन्यात हे गार्डन भाविकांनासाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीष दिघे यांनी दिली.

     

सम्बन्धित सामग्री