Thursday, July 04, 2024 11:25:18 AM

naina-project-affected-people-march-on-legislature
नैना प्रकल्प बाधितांचा विधिमंडळावर पायी मोर्चा

नैना प्रकल्प बाधितांचा विधिमंडळावर पायी मोर्चा

पनवेल, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पनवेल तालुक्यात ‘नैना’ प्रकल्प महाराष्ट्र सरकारने येथील शेतकऱ्यांवर लादला असून नैनाच्या जाचक अटींसंदर्भात आवाज उठविण्यासाठी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी यांच्यासह हजारो स्थानिकांचा मोर्चा गुरुवारी विधिमंडळावर धडकणार आहे. नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती आणि महाविकास आघाडीतर्फे पनवेल ते विधिमंडळ पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात नैना प्रकल्प बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. स्वतःची जमीन नसताना देखील सिडको प्रशासनाची ही यंत्रणां शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी ६०टक्के जमिनीवर अतिक्रमण करणार असल्याने शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवलाय.आतापर्यंत अनेक आंदोलन करण्यात आली मात्र सरकार दरबारी सकारात्मक प्रतिसाद भेटत नसल्याने अधिवेशन सुरु असतानाच थेट विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्यात आला. ‘नैना’च्या हद्दपारीसाठी प्रकल्पबाधितांचा लाँग मार्च पनवेल येथून गुरुवारी (ता. ३) निघून तो शुक्रवारी विधिमंडळावर धडकणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील २३ गावांसह नवी मुंबई व उरण परिसरातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. नैना प्रकल्पामध्ये जमीन अधिग्रहण करण्यासाठी ६०-४० ते समीकरण वापरले जात आहे. हे समीकरण शेतकऱ्यांना मान्य नाही. कोणत्याही सरकारी प्रकल्पांना जमीन संपादित केली जाते व त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. मात्र या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले गेले नसल्याने शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. नवी मुंबई विमानतळ बांधण्यासाठी जमीन संपादित केली गेली व येथील नागरिकांना त्याचा मोबदला दिला गेला. मात्र ‘नैना’मध्ये तसे होत नाही. नैनामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे नैनाला २०१३ पासून तब्बल दहा वर्षे विरोध केला जात आहे. त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांच्या भावना विधिमंडळात पोहोचविण्यासाठी हा लाँग मार्च सुरू होऊन शुक्रवारी विधिमंडळावर धडकणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली.

     

सम्बन्धित सामग्री