Saturday, July 06, 2024 11:15:25 PM

agitation-of-contract-employees-of-best
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: बेस्टच्या कंत्राटी कामगारांना आवश्यक सुविधा द्याव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा आदी विविध मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२ जुलै) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. याचा मोठा परिणाम बेस्टच्या वाहतूक व्यवस्थेवर होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील कंत्राटी कामगारांनीही काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील बस सेवेवर परिणाम झाला. बस न आल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रिक्षा-टॅक्सी आदी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागण्या:

बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, बेस्टचे सर्व बंद मार्ग पूर्ववत करा, प्रत्येक बस मार्गावर बसची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा, नादुरुस्त बस दुरुस्त केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा, मुंबईसाठी बेस्टच्या मालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० करा आदी मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

     

सम्बन्धित सामग्री