Wednesday, October 02, 2024 11:03:35 AM

burkha-ban-in-chemburs-ng-acharya-college
चेंबूरच्या एन. जी. आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी

चेंबूरच्या एन जी आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी

एन.जी.आचार्य महाविद्यालयात लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांचे उल्लंघन केल्याने विद्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याबद्दल आज दुपारपासून सायंकाळपर्यंत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

एन.जी.आचार्य डी.के. मराठे, कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात एकूण २३६६ विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतला आहे. एकूण २९४ मुस्लीम विद्यार्थिनी यात शिकतात, त्यापैकी १३ टक्के मुस्लिम विद्यार्थिनी ड्रेस कोडला विरोध करत आहेत. सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व समानता निर्माण व्हावी यासाठी ड्रेस कोडचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

या विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी यापूर्वी महाविद्यालयात त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालक आणि विद्यार्थी यांच्यात ड्रेस कोडवर एकमत झाले. यासंदर्भात कॉलेजने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार या सूचना दिल्या होत्या. शिवाय, महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब किंवा बुरखा, निकाब घालू नये, असेही शिक्षकांकडून सांगण्यात आले. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विद्यागौरी लेले यांनी सांगितले. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चेंबूर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थैर्य निर्माण केले आहे.

           

सम्बन्धित सामग्री