Thursday, July 04, 2024 10:04:04 AM

municipality-ready-for-ganeshotsav
गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज,मूर्तीकारांनाही दिलासा

गणेशोत्सवासाठी महापालिका सज्जमूर्तीकारांनाही दिलासा

मुंबई ०२ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाच्या आगमणाला आता काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी घरांघरात बाप्पा विराजमान होतील. कोकणाबरोबरच मुंबईतही मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मूर्तीकारांचे पैसेही वाचणार आहेत. मुंबई महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीसाठी मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे समन्वयक, मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या बैठकीत प्रामुख्याने मूर्तीकारांना भराव्या लागणाऱ्या अनामत रक्कमेत कपात करण्यात आली आहे. आता प्रतिमूर्ती १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम एक हजार रुपये प्रति मूर्ती होती. त्याचबरोबर पीओपीपासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांना मोठा दिलासा देत सरसकट प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवरील बंदी हटवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले तरी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. या बैठकीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिका क्षेत्रात चिनी गणेशमूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घेण्याबाबतचा आढावाही घेण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री