Tuesday, July 09, 2024 02:35:23 AM

धुळ्यात आढळलेली बोगस खते

धुळ्यात आढळलेली बोगस खते

बेकायदेशीरपणे विविध प्रकारची बोगस खते तयार करून विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड कंपनीचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. धुळे शहराजवळील अवधान एमआयडीसी मधील ग्रीनफिल्ड कंपनीमध्ये ८ जुलै रोजी धडक कारवाई केली होती. त्या कारवाईत ४ खतांचे नमुने घेण्यात आले होते, सुमारे दहा लाख रुपये किंमत असलेल्या अठरा - अठरा - दहा या दाणेदार युरियाच्या ८०० पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या आणि या चारही नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये हे चारही खतांचे नमुने नापास झाले आहेत , म्हणजेच ते वापरण्याजोगे नाही. म्हणूनच ग्रीनफिल्ड कंपनीचा राज्यस्तरीय परवाना रद्द करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री