Monday, July 01, 2024 03:39:52 AM

मुंबई - अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली

मुंबई - अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली

मुंबई, २५ जुलै २०२३, प्रतिनिधी: मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दरड दुर्घटनेमध्ये पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे. यामुळं इमारतीच्या १६५ घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटना स्थळावर दाखल झाले. अंधेरी चकाला रामबाग सोसायटीत २३ वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये रात्री दरड दुर्घटना घडली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बॉम्ब ब्लास्ट सारखा आवाज आला. इमारतीमध्ये रहिवासी झोपेत असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळून इमारतीच्या भिंती तोडून दगड घरामध्ये शिरले आहेत. त्यामुळं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली आहे. सध्या या घटनांमुळं इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


सम्बन्धित सामग्री