Friday, July 05, 2024 02:32:14 AM

रोहित पवारांचं आंदोलन मागे

रोहित पवारांचं आंदोलन मागे

जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रोहित पवारांनी सोमवारी २४ जुलै विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यावर आंदोलन केले. याचे विधानसभेत पडसाद उमटले. यावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी कान टोचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी रोहित पवार हे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. विधानसभेत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, “रोहित पवार बाहेर पावसात त्यांच्या जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसीची मागणी केली होती. मागच्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले होते की, अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दल आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, तरी त्याचे आदेश निघालेले नाहीत. त्यासाठी ते उपोषण करताहेत आणि शासनाने याची दखल घ्यावी, ही विनंती.’


सम्बन्धित सामग्री