Monday, July 08, 2024 10:40:25 PM

सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरण

सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरण

सिन्नर, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वावी पोलिसांनी १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, आता यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, त्यापैकी आता आठ जणांना आता अटक करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांची काय प्रतिक्रिया? टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, असं अमित ठाकरे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री