Sunday, October 06, 2024 02:59:58 AM

was-that-baby-in-the-drain-really-found
नाल्यात पडलेलं ‘ते’ बाळ खरंच सापडलं?

नाल्यात पडलेलं ‘ते’ बाळ खरंच सापडलं

लोकलमधून उतरताना एका महिलेच्या हातून तिचं बाळ निसटून थेट नाल्यातून वाहून गेल्याचं वृत्त प्रचंड व्हायरल झालं आहे. कारण प्रत्यक्षदर्शींपैकी काही जणांनी हा प्रकार ट्रेनमधून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. ज्याचा व्हिडीओ हा अवघ्या काही मिनिटात प्रचंड व्हायरल झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याने प्रत्येकाने याबाबत हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अचानक सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशी माहिती व्हायरल झाली की, कल्याणजवळ नाल्यात पडलेलं बाळ हे सापडलं आहे. त्याला एनडीआरएफने वाचवलं आहे. अशा मेसेजसह एक फोटो देखील व्हायरल झाला. ज्यामध्ये एनडीआरएफच्या टीमने एका बाळाला हातात घेतलं असल्याचं पाहायला मिळत होतं. या फोटोमुळे अनेकांचा असा समज झाला की, कल्याणमध्ये वाहून गेलेलं ते बाळ सुखरुपपणे वाचलं. पण दुर्दैवाने असं काहीच घडलेलं नाही. कारण व्हायरल केला जाणारा फोटो हा साधारण वर्षभरापूर्वीचा आहे. जो मागील वर्षीचा पोलादपूरमधील असल्याचं समजत आहे. पुरामधून एनडीआरएफने एका बाळाला वाचवलं होतं तो फोटो आता पुन्हा व्हायरल झाला आहे.

                 

सम्बन्धित सामग्री