Wednesday, July 03, 2024 01:34:18 PM

the-prices-of-vegetables-have-gone-up
भाजीपाल्याचे दर कडाडले

भाजीपाल्याचे दर कडाडले

धुळे जिल्ह्यामध्ये टोमॅटो पाठोपाठ सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यंदा जिल्ह्यामध्ये पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे हिरव्या भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे मालाला उठाव कमी होत असल्याचं भाजीविक्रेत्यांचं म्हणणं आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी जुलै महिना अर्धा सम्पला असला तरीही पुरेसा पाऊस पडलेला नाही. नदी नाले अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम भाजीपाला पिकांवर झालेला आहे. भाजीपाला पिकं वेळेवर न निघाल्यामुळे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्याभरामध्ये सर्वच भाजीपाल्याच्या दरामध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा विक्रेते सांगत आहेत. महागडा भाजीपाला हा गृहिणींचं बजेट बिघडवणारा ठरत आहे. त्यामुळे भाजपालाला उठाव नसल्याचा ही व्यापारी सांगत आहेत.


सम्बन्धित सामग्री