Monday, July 08, 2024 04:31:12 AM

sudden-tree-felling-of-hospitals-by-commissioner
आयुक्तांकडून अचानक रुग्णालयांची झाडाझडती

आयुक्तांकडून अचानक रुग्णालयांची झाडाझडती

मुंबई १९.जुलै.२०२३ : पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान रुग्णालयांपुढे असताना रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली जाणेही आवश्यक असते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये साफसफाई मोहीम जोरात सुरू झालेली दिसून येत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये भटकी कुत्री फिरताना दिसतात. कुठेही दिसणारी मांजरांची पिल्ले, अस्ताव्यस्त पडलेले सामान, अस्वच्छ स्वछतागृहे ही अवस्था असते. ही परिस्थिती पाहून यासंदर्भात विचारणा झाल्यानंतर आता रुग्णालयांमध्ये साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. कानाकोपऱ्यात अस्तव्यस्त पडलेले सामान मार्गी लागले आहे. कित्येक दिवसांपासून स्वच्छता न झालेल्या स्वच्छतागृहांची सफाई करण्यात येत आहे. भिंतींवरील जाळे काढणे, बंद पडलेल्या पंख्यांची दुरुस्ती केली जात आहे. रुग्णालयांत गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याचे तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचे निर्देश सुरक्षारक्षकांना देण्यात आले आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी, पालिका रुग्णालयांमध्ये येताना रुग्णांच्या अस कपाळावर आठी असायला नको, हा संस् त्यमागील उद्देश असल्याचे सांगितले. शव रुग्णालयांमध्ये स्वच्छता असायलाच देण्य हवी. रुग्णांची प्रेमाने व आस्थेने चौकशी व्हायला हवी


सम्बन्धित सामग्री