Sunday, July 07, 2024 12:32:08 AM

two-detained-on-suspicion-of-terrorist-attack-in-pune
पुण्यात दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात

पुण्यात दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात

पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलीस आणि एटीएसकडून ही संयुक्त करवाई करण्यात आली आहे.

पुण्यात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने मोठी कारवाई केली. या कारवाईत एटीएसने २ जणांना पकडले आणि तिसऱ्याचा शोध सुरू आहे. एटीएसची कारवाई सुरू असताना तिसरी व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरली. या व्यक्तीचा शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे. या व्यक्तीला दिसताक्षणी पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोंढवा परिसरात राहणारे ३ जण वारंवार कोथरूड परिसरात जात आहेत. या सर्वांच्या हालचाली अतिशय संशयास्पद अशा असल्याची माहिती खबऱ्यांनी एटीएसला दिली. यानंतर कारवाई करून एटीएसने २ जणांना कोथरूडमधून मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी रात्री उशिरा पकडले. एटीएस आणि पुणे पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून २ जणांना पकडले. पकडलेल्या २ जणांची एटीएस कसून चौकशी करत आहे. एटीएसने पकडलेल्यांकडून लॅपटॉप जप्त केले आहेत. जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये देशविघातक साहित्य आढळल्याचे वृत्त आहे.

बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता. पुण्यातून पाच संशयित बांगलादेशींनी अटक करण्यात आली होती. मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं उघड झाले होते. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारउल बांगला टीम म्हणजेच ए बी टी या संघटनेनं महाराष्ट्रात तीन शहरात जाळं पसरवलं होतं. ही दहशतवादी संघटनेनं पुणे, महाड आणि अंबरनाथमध्ये पाळमुळं रोवली असल्याचं आता पुढे आले होते. अन्सार उल बांगला टीम अर्थात ए बी टी या दहशतवादी संघटनेवर २०१६ मध्ये बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आलीय. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. पण यापैकी कुठलीही योजना पूर्ण होण्याआधीच एटीएसनं पाच जणांना अटक करून कट उधळून लावला.

याआधी मागच्यावर्षी मे महिन्यात पुण्यातून एकाला अटक करण्यात आली होती. पुण्याच्या दापोडी भागात ही कारवाई केली होती. पकडलेली व्यक्ती लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होती आणि दहशतवाद्यांच्या संपर्कात होती.


सम्बन्धित सामग्री