Tuesday, July 02, 2024 08:33:28 AM

what-did-mla-alwani-say-about-the-development-plan-of-the-airport
विमानतळाच्या विकास आराखड्याबाबत काय म्हणाले आमदार अळवणी ?

विमानतळाच्या विकास आराखड्याबाबत काय म्हणाले आमदार अळवणी

मुंबई, १८ जुलै २०२३, प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोणते निर्णय घेतले जाणार याकडेच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार पराग अळवणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराच्या अंतरिम विकास आराखड्याचा मुद्दा मांडला. यावेळी बोलताना अळवणी यांनी विमानतळ परिसराच्या अंतरिम विकास आराखड्यास अंतिम मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

काय म्हणाले पराग अळवणी?

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी एमआरटीपी (मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा) संबंधी विधेयकावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी आरखडा तयार करताना कलम ३०/३१ अंतर्गत अंतिम आराखडा न तयार करता कलम ३२ अन्वये अंतरिम विकास आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा तयार करताना शेजारील झोपडपट्टीने व्याप्त असलेली सुमारे २०५ एकर जमीन आराखड्यातून तात्पुरती बाहेर ठेवण्यात आली होती.

सदर झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी 'मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रा.ली.'ने घ्यावी आणि त्यानंतर अतिरिक्त जागेसहित अंतिम आराखडा तयार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र १० वर्षे उलटूनसुध्दा याबाबत कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे वगळलेल्या भागासहित आराखडा तयार झाला तर झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत एमएमआरडीएला निर्णय घेता येणार असल्याने त्वरित याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली.

भाजपा आमदार पराग अळवणी यांनी विधानसभेत कोणत्या मागण्या केल्या?

"प्रशासन स्वतःला पाहिजे तेथे एमआरटीपीमध्ये (मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा) बदल सुचवते मात्र सामान्य जनतेचे प्रश्न आणि विकास सुकर होण्यासाठी सुद्धा सुयोग्य बदल व्हावा. त्यामुळे नगर योजनेतील आवश्यक छोटे बदल करण्यासाठी कलम ९१ मध्ये शिथिल करणे,अन्य विविध प्रस्ताव पारित करण्यासाठी सुद्धा कालमर्यादा ठरवावी", अशा मागण्या आमदार पराग अळवणी यांनी विधानसभेत केल्या.


सम्बन्धित सामग्री