Saturday, October 05, 2024 03:32:14 PM

a-tourist-carried-away
एक पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना

एक पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना

नाशिक १७ जुलै २०२३: नाशिकमधील दुगारवाडी धबधबा परिसरात रविवार विकेंड सुट्टीच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांमधून एक जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल दुपारी उशिरा ही घटना घडली असून वन विभागासह पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक त्रंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा परिसरात येत असतात. त्रंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाला नसला तरी पावसाची संततधार कायम सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यांसह धबधबेही ओसंडून वाहायला लागले आहे. शनिवार रविवारी मुख्यता अनेक पर्यटकांची गर्दी या ठिकाणी असते. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पर्यटकांना शनिवारी पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु रविवारी पर्यटकांची गर्दी होऊन दुपारी चार वाजेच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने नाशिक येथील एक सतरा वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अमित शर्मा असे या तरुणाचे नाव आहे नाशिक देवळाली कॅम्प येथील हा रहिवासी असून . या घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली. परंतु सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत तरुणाचा पत्ता लागला नाही. आज पहाटे ५ वाजल्यापासूनच शोध मोहीम पुन्हा सुरु करण्यात अली आहे. तरुणाचा पाय घासरल्याने दुगार नदीत वाहून गेल्याची होत आहे भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तरुणाचा काहीच पत्ता लागलेला नाही.

              

सम्बन्धित सामग्री