Sunday, July 07, 2024 09:11:36 PM

know-railway-megablock-schedule
जाणून घ्या रेल्वेच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक

जाणून घ्या रेल्वेच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक

  मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच रेल्वे. माटुंगा, मुलुंड, अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून सकाळी मेगाब्लॉक सांगण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना घराबाहेर पडताना विचार करावा लागणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ दुपारी ३.१५ वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान सेवा या जलद मार्गावरुन वळवण्यात येणार आहेत. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहेत. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेहून १५ मिनिटे उशिराने अंतिम स्थानकावर पोहोचतील. सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबवून अप जलद मार्गावर माटुंगा स्थानकावर वळवण्यात येतील आणि ते स्थानकावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. हार्बर मार्गावरही घेण्यात येणार ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० सायंकाळी ४.४० पर्यंत आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावरील सेवा सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत बंद राहणार आहेत. तर तसेच पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी ९.५३ दुपारी ३.२० कालावधी मध्ये पूर्णपणे ठप्प राहणार आहेत. अभियांत्रिकी आणि रेल्वे गाड्यांची देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

           

सम्बन्धित सामग्री