Friday, July 05, 2024 06:18:59 AM

there-is-a-possibility-of-increased-rainfall-in-the-state
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे १६ जुलै २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु झालेला आहे . परंतु काही ठिकाणी अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. राज्यातील अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा फार कमी पाऊस पडलेला आहे. जून महिन्यातले १५ दिवस उटलूनही पावसाची पूरक सुरुवात झालेली नाही. राज्यातील धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १६% कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये सध्या फक्त ३०% पाणीसाठा आहे. या वर्षी बिपरजॉय या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या. तसेच कृषी व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. अजूनही महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. १५ जुलैला बंगाल उपसागरात चक्रीवादळ निर्माण होईल. त्यांनतर १९ जुलैला पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. या वादळांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पाऊस वाढण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

           

सम्बन्धित सामग्री