Saturday, July 06, 2024 11:48:20 PM

30-gates-of-hatnur-dam-opened
हतनुर धरणाचे ३० दरवाजे उघडले.

हतनुर धरणाचे ३० दरवाजे उघडले

  विदर्भ आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण ओसंडून वाहू लागले आहे. पाऊसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आणि म्हणून शुक्रवारी हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत ३० दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ३९२०० क्यूसेस पाणी वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे ३० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात ३९ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. या दरवाजांमधून ९५३५१ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सारखी वाढत आहे. यामुळे धरणाच्या ३० दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाचे ४१ पैकी ३० दरवाजे १.५० मीटरने उघडून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आले. नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री