Sunday, July 07, 2024 12:24:35 AM

why-is-this-actress-upset-with-preity-zinta
प्रीती झिंटावर "ही" अभिनेत्री नाराज का ?

प्रीती झिंटावर "ही" अभिनेत्री नाराज का

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती आणि प्रख्यात दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या घटस्फोटाला १५ वर्षे उलटली. मात्र या घटस्फोटामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान आता एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सुचित्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिने तिनं थेट प्रीती झिंटाचे नाव घेत आरोप केले आहे. सुचित्राने एका मुलाखतीत प्रीतिच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. २००० साली सुचित्राने अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्यावर तिचं घर तोडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी प्रीतिनं म्हटलं होतं की, "मी सगळ्यात आघाडीची अभिनेत्री आहे आणि तू तर साधी गृहिणी आहेस. तेव्हा तू माझ्याशी असं बोलू नकोस. एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे." असा सल्ला प्रीतिने त्यावेळी सुचित्राला दिला होता. आता सुचित्रानं प्रीतिच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रीतीनं तिच्या त्या वक्तव्यामुळे सुचित्राची माफीही मागितली होती, असे म्हंटले जाते. पण तोपर्यत खूप उशीरही झाला होता. परंतु अलीकडेचं झालेल्या एका मुलाखतीमध्ये सुचित्रानं सांगितलं की, "मी अजून तिला माफ केलेलं नाही. ती माझ्यासाठी कुणीही नाही. मला तिला माफ करण्याची गरजही नाही. कारण आता माझ्यालेखी तिचे काहीही महत्व नाही." यामुळे सध्या समाज माध्यमांवर याची बरीच चर्चा सुरु आहे.


सम्बन्धित सामग्री