Tuesday, July 02, 2024 08:22:16 AM

monsoon-session-of-legislature-from-17th-july
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार असून १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत पार पडणार असून १५ दिवसीय अधिवेशन असणार आहे. दरम्यान, १७ जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला. अजित पवारांच्या बंडानंतर मात्र राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला होता. त्याचे पडसाद यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये पाहायला मिळाले होते. आता अजित पवारांच्या बंडानंतरही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत.


सम्बन्धित सामग्री