Monday, July 01, 2024 03:58:31 AM

child-dies-after-wall-collapses-in-bhiwandi
भिवंडीत भिंत कोसळून बालकाचा मृत्यू

भिवंडीत भिंत कोसळून बालकाचा मृत्यू

मंगल कार्यालयाची धोकादायक भिंत कोसळल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात घडली. येथील धोकादायक संरक्षक भिंत पाडण्यासाठी गेलेल्या जेसीबीचा धक्का लागल्याने पलीकडच्या बाजूच्या नागरी वस्तीत भिंत कोसळली. शेजारील घरावर भिंत कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहे. यामध्ये त्या ठिकाणी खेळत असलेले तीन चिमुकले, दोन वृद्धांसह एक तरुणी जखमी आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

भिवंडी शहरातील ४० ते ४५ वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली होती. स्थानिकांच्या मदतीनं मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं. परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या मागे ४० ते ४५ वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलं या ढिगाऱ्याखाली अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी ( १० वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर रिजवान अन्सारी (वय १४ वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे


सम्बन्धित सामग्री