Monday, July 01, 2024 03:46:35 AM

one-person-was-killed-when-a-tree-fell-on-him
अंगावर झाड कोसळून एकजण ठार

अंगावर झाड कोसळून एकजण ठार

पावसाने आता मुंबईसह उपनगरात जोर धरला आहे. पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला असून सुरुवातीलाच जोरदार फटका बसला आहे. उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात पाऊस सुरू आहे. दरम्यान, भायखळ्यात मध्यरात्री झाड कोसळून तीन जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. इंदू ऑईल मिल कंपाउंडमध्ये मध्यरात्री २.३० वाजता ही घटना घडलीये.सध्या जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव रेहमान खान (२२) असं आहे. राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत.


सम्बन्धित सामग्री