मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात राहत असलेला अभिनेता सैफ अली खान याच्या सदगुरू शरण निवास घरात एका संशयित आरोपीने रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने आरोपीला पाहून पाठलाग केला. आरोपीने चाकूचा धाक दाखवत महिलेवर हल्ला केला. या गोंधळात सैफ अली खान खाली आला. आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला व त्यानंतर तो पळून गेला.
महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरात घुसताना चाकूचा वापर करून सैफ अली खान याच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. चकमकीत महिलेच्या हाताला मोठी जखम झाली, तर सैफ अली खानच्या मानेवर, खांद्यावर, पाठीवर आणि हातावर वार झाले.
त्या वेळी करीना कपूर कौटुंबिक पार्टीसाठी बाहेर होती. गोंधळ ऐकून तिने सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम याला संपर्क केला. जखमींना त्वरित लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
सीसीटीव्हीत आरोपी दिसला..
अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या फ्लोअरचे पाॅलिशिंगचे काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलिस चौकशी करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, खानवर हल्ला करणारा आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती का ? त्याने ११ व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला, जिथे सैफअली खान त्याच्या कुटुंबासह राहतो.
इतर फ्लोअरवर न शिरता आरोपी थेट ११ व्या माळ्यावरच कसा शिरला,यावरून त्याला इमारतीतील प्रत्येक गोष्टीची माहिती होती का ? असाही प्रश्न उपस्थित करत फ्लोअरिंग पाॅलिशिंगसाठी आलेल्या व्यक्तींशी आरोपीचा काही संबध आहे का ? हे पोलिस तपासात आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला शेवटचे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पळताना तो सीसीटिव्हीत कैद झाला
मात्र घराच्या लॉबीमध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला नाही.
दरम्यान संशयित आरोपी ज्या सहाव्या माळ्यावरील सिसीटिव्हीत दिसून आला आहे तो ६ व्या माळ्यावरील एका रहिवाशाने लावला आहे.
मात्र त्यानंतर इमारतीबाहेर पळताना, इमारती परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत किंवा मुख्यप्रवेश द्वारातून बाहेर पडतानाही दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
त्यामुळे या हल्यात इतर कोण आरोपी सहभागी आहे का ? याचा पोलिस तपास करत आहेत.पोलिसांनी सैफ अली खान यांच्या घरातील आणि इमारतीतील सीसीटीव्ही तपासले. आरोपी सहाव्या मजल्यावरून खाली जाताना दिसला, मात्र घराच्या लॉबीमधून बाहेर पडताना किंवा मुख्य प्रवेशद्वारातून जाताना कैद झालेला नाही.
संशयिताने ११ व्या मजल्यावर थेट पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला. त्याला इमारतीच्या संरचनेची माहिती असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात फ्लोअर पॉलिशिंगचे काम करणाऱ्या दोन कामगारांची चौकशी केली जात आहे.
पोलीस पथकांची तपास यंत्रणा सक्रिय
संपूर्ण मुंबईत आरोपीचा शोध घेण्यासाठी वीस पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनेही विशेष पथक तयार केले आहे. सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी लवकरच आरोपीला पकडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
करीना कपूरची मीडियाला विनंती
घटनेनंतर करीना कपूरने मीडियाला आपत्तीजनक अंदाज आणि सततच्या कव्हरेजपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. “आमच्या कुटुंबासाठी हा एक आव्हानात्मक दिवस आहे. या कठीण काळात आम्हाला स्पेस आणि वेळ देण्याची विनंती आहे,” असे तिने म्हटले आहे.
सध्या पोलिसांनी इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो आणि तपशील घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच, हल्ल्याच्या घटनेत अन्य कोणी सहभागी आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.
👉👉 हे देखील वाचा : सैफ अली खानावर घरात घुसून चाकूने हल्ला
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम