Monday, February 03, 2025 05:27:15 PM

historical tiger claws in nagpur
शिवकालीन ऐतिहासिक वाघनखं आज नागपुरात येणार

आज नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. याच कारण आहे शिवकालीन ऐतिहासिक वाघनखं.

शिवकालीन ऐतिहासिक वाघनखं आज नागपुरात येणार

नागपूर: आज नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. याच कारण आहे शिवकालीन ऐतिहासिक वाघनखं. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील सात महिन्यापासून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे नागपूरात आज दाखल होणार आहे. 7 तारखेला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडेल आणि आठ तारखेला नागरिकांना पाहण्यासाठी खुले हे  करण्यात येणार आहे. त्याकरिता नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात मोठी तयारी आणि पोलीसांची सुरक्षा देखील असणार आहे. विशेष म्हणजे आपला इतिहास आताच्या पिढीला चांगल्या पद्धतीने माहित व्हावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात मोफत प्रवेश असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंदचे वातावरण पाहायला मिळतंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा इतिहास: 
शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांना लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या साता-याच्या वारसदारांकडे ही वाघनखं होती.
1824 मध्ये ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँड डफ वाघनखं घेऊन ब्रिटनला परतला.
डफच्या वारसदारांनी ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला दिली.
शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांना सातारा येथील संग्रहालयातही ठेवण्यात आले.
आता ती ऐतिहासिक वाघनखं नागपुरात येणार आहे. 

शिवाजी महाराजांच्या वाघनखांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी:
शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात पहिल्यांदा वाघनखे तयार करण्यात आल्या होत्या. 
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळी त्यांनी वाघनखे वापरली असल्याचं म्हटलं जात. 

दरम्यान आता सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील सात महिन्यापासून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे नागपूरात आज दाखल होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. 
 


सम्बन्धित सामग्री