३ सप्टेंबर, २०२४, मुंबई : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षण म्हणजे केवळ शाळा - महाविद्यालयातील शिक्षक नव्हेत, तर आपल्या आयुष्यात आपल्याला महत्वाचं काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती आपली शिक्षकच असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अशाच शिक्षकांसाठी पाठवा खास शुभेच्छा...
१) गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
२) अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणार्या,
गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
३) "लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…
बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले…
अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
४) “शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ, जो आमचं जीवन उजळतो.
तुमचं मार्गदर्शन आणि शिकवणीसाठी मनःपूर्वक आभार.
५) "काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
६) शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...
७) गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!