५ ऑगस्ट, २०२४, मुंबई : हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असलेला श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला समाप्त होतो. सोमवारी ५ ऑगस्ट पासून श्रावण महिन्याचा प्रारंभ होत आहे. ७२ वर्षानंतर श्रावणी सोमवारी श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्यात विशेषतः शिवभक्तीला महत्त्व असते. या महिन्यात प्रत्येक सोमवार (श्रावणी सोमवार) विशेष महत्त्वाचा असतो. त्यामुळे या दिवशी भाविक शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. हा महिना अनेक सण-समारंभ, व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. आपल्या प्रियजनांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश तुम्ही पाठवू शकता.
१) हसरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजिरा
श्रावण आला !
श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!
२) रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!
३) "एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उध्दार.
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!"
४) सणासुदीची घेऊन उधळण आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
५) "दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्रावण सोमवारच्या
शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो.
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा"
६) "आला श्रावण घेऊन शिवाचा सोमवार.
बिल्वपत्र, धवल सुमने अपूर्ण करू वंदन त्रिवार
पवित्र श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा"
७) शिव हेच सत्य आहे,
शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि
शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
८) "पवित्र श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा!"
९) येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
१०)जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!