तांदळापासून बनवलेल्या झटपट आणि चविष्ट रेसिपी आपल्या दैनंदिन आहारात विविधता आणू शकतात. खालील काही सोप्या आणि स्वादिष्ट तांदळाच्या रेसिपी आपण घरच्या घरी तयार करू शकता:
1. तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत वडे:
अचानक लागलेल्या भुकेसाठी किंवा चहासोबतच्या नाश्त्यासाठी तांदळाच्या पिठाचे वडे एक उत्कृष्ट पर्याय आहे. हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. त्यांना हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करता येते.
साहित्य:
1 कप तांदळाचे पीठ
2 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून चिली फ्लेक्स
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
काही कढीपत्त्याची पाने
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
कढईत पाणी गरम करून त्यात जिरे, चिली फ्लेक्स, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि मीठ घाला.
पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.
गॅस बंद करून मिश्रण ५-७ मिनिटे झाकून ठेवा.
नंतर, उकडलेले बटाटे घालून मिश्रण मळून घ्या.
हाताला तेल लावून लहान लहान वड्यांचे गोळे तयार करा.
कढईत तेल गरम करून वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
गरमागरम वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
हेही वाचा: Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट
2. तांदळाच्या पिठाचे झटपट डोसे:
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी तांदळाच्या पिठाचे डोसे एक उत्तम पर्याय आहे. हे डोसे तयार करणे सोपे असून ते चविष्ट लागतात.
साहित्य:
2 कप तांदळाचे पीठ
2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
5-6 कढीपत्त्याची पाने
चवीनुसार मीठ
पाणी
तेल
कृती:
एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि मीठ घालून मिक्स करा.
त्यात थोडे थोडे पाणी घालून पातळसर पीठ तयार करा.
तव्यावर थोडे तेल लावून गरम करा.
तयार पीठ तव्यावर घालून डोशाचा आकार द्या.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम डोसे चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा
.
3. तांदळाची उकड (ताकातली उकड):
पारंपारिक महाराष्ट्रीयन नाश्ता म्हणून ओळखली जाणारी तांदळाची उकड हलकी आणि पचनास सोपी असते. ती बनवायला सोपी असून चविष्ट लागते.
साहित्य:
1 कप तांदळाचे पीठ
1 कप दही
अर्धा कप पाणी
5-6 लसूण पाकळ्या
3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
आल्याचे बारीक तुकडे
चवीनुसार मीठ
कढीपत्त्याची पाने
तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद
कृती:
एका भांड्यात दही घुसळून त्यात पाणी मिसळून ताक तयार करा.
ताकात तांदळाचे पीठ, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट घालून गुठळ्या रहाणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
तयार फोडणीत तांदळाचे मिश्रण घालून चांगले ढवळा आणि झाकण ठेवून मंद आचेवर तयार करा