मुंबई : जागतिक हृदय दिन हा दरवर्षी २९ सप्टेंबरला हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. अलिकडे २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटका येण्याच्या प्रकऱणात वाढ झाली आहे. चुकीची जीवनशैली, व्यसनाधीनता आणि वाढत्या ताणतणावाचे दुष्परिणाम तरूणांवर अधिक प्रमाणात होत आहेत. विशेषत: धुम्रपान करणाऱ्या तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण जास्त दिसून येत असून हृदयाशी संबंधित आजारांची नोंद जीवनशैलीचे आजार म्हणून केली जाते. ज्यामध्ये खाण्याच्या सवयीत सकस आहार ८० टक्के आणि शारीरिक हालचाली आणि सवयी २० टक्के जबाबदार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.