Increase In Blood Sugar Level At Night: रात्री चिप्स, पॉपकॉर्न आणि चॉकलेट, कँडीसारखे कोणतेही गोड किंवा पचायला जड असलेल स्नॅक्स पदार्थ खाल्ले तर, रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यातही तुमचे वय जास्त असेल किंवा तुमचे शरीर लठ्ठपणाकडे झुकलेले असेल, तर रक्तातील साखर अधिक वेगाने वाढण्याचा धोका असतो.
मधुमेह ही इतकी गंभीर समस्या आहे की, एकदा ती जडली की, त्याने संपूर्ण शरीराला वेठीस धरले जाते. यामुळे हळूहळू ती अनेक आजारांचे कारण बनते. म्हणूनच ब्लड शुगरच्या असंतुलनाला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. अशा परिस्थितीत साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे खूप लक्ष द्यावे लागते. ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, त्यांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
चिप्स, पॉपकॉर्न, चॉकलेट आणि कँडीमुळे साखर का वाढते?
जाणून घेऊ, रात्री उशिरा खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कशी वाढते.. कोणत्याही वेळी जेवणानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत थोडीशी वाढ होते. मात्र, ही बाब अगदी सर्वसाधारण आणि नैसर्गिक आहे. मात्र, जेवणानंतर लगेच बैठे काम किंवा आराम करू नये. शक्यतो, हलके चालणे किंवा चालत-फिरत छोटी-मोठी कामे करत राहणे आवश्यक आहे. यामुळे रक्तात तयार झालेली साखर वापरली जात राहते.
रात्रीच्या जेवणालाही हाच नियम लागू पडतो. यासाठी जेवल्याबरोबर लगेच झोपणे योग्य नाही. तसेच, जेवणानंतर सतपावली करणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. तसेच, रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये अडीच ते तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच, रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. तसेच, एकदा जेवण झाल्यानंतर अधे-मधे काहीही खात बसू नये. अनेकांना रात्री टीव्ही पाहण्याची आणि त्याचवेळी काहीतरी खाण्याची सवय असते. मात्र, अशी सवय पूर्णपणे बंद केलेलेच आरोग्यासाठी चांगले.
रात्रीच्या जेवणाची वेळ
रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपेचे वेळापत्रक योग्य पद्धतीने बसवण्यासाठी रात्रीच्या जेवणाची वेळ सूर्यास्ताच्या काही वेळ अगोदरची असावी. यामुळे मधुमेहासह इतर अनेक आजार-विकारांमध्ये फायदा होईल. तसेच, रात्री जेवणात खाल्ले जाणारे पदार्त पचायला हलके असावेत आणि त्यांचे प्रमाणही माफक असावे.
हेही वाचा - High BP: हल्ली तरुण वयातच का होऊ लागलाय उच्च रक्तदाब? तज्ज्ञांनी सांगितलं या 'सायलेंट किलर' आजारावर नियंत्रण कसं ठेवावं
तज्ज्ञ काय म्हणतात?
दिवस जसजसा पुढे सरकत जातो, तसतसे शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊ शकते. इन्सुलिन हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असलेला हार्मोन आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जंक फूड किंवा स्नॅक्स खाता तेव्हा शरीर त्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्स आणि साखरेवर प्रभावीपणे प्रक्रिया करू शकत नाही. चिप्स, पॉपकॉर्न, चॉकलेट आणि कँडी सारख्यास्नॅक्समुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण, त्यात कोलेस्टेरॉल, कार्बोहायड्रेट्स, सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असते.
रात्री उशिरा जेवल्याने किंवा रात्रीच्या जेवणानंतर काही-बाही खात राहण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते. कारण, या काळात शरीराची नैसर्गिक इन्सुलिन संवेदनशीलता कमी असते. जेव्हा आपण अन्न खातो, विशेषतः साखर किंवा साधे कार्बोहायड्रेट्स असलेले स्नॅक्स, तेव्हा शरीर हे अन्न ग्लुकोजमध्ये मोडते. जे नंतर रक्तप्रवाहात प्रवेश करते. खरं तर, शरीराचा चयापचयाचा वेग संध्याकाळी मंदावतो. शरीर ग्लुकोज प्रक्रिया करण्यात तितकेसे कार्यक्षम नसते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि ती रात्रभर टिकून राहू शकते.
याशिवाय, रात्री उशिरा वारंवार नाश्ता केल्याने इन्सुलिन प्रतिरोध, वजन वाढणे आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तसेच, यामुळे झोपेचा त्रास, उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि हृदयरोग देखील होऊ शकतात.
हेही वाचा - Eat A Tomato Everyday: दररोज रिकाम्या पोटी टोमॅटो खा.. मधुमेहासह या 3 समस्या होतील गायब
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)