Thursday, November 21, 2024 11:59:57 AM

Pitru Paksha 2024
पितृपक्षामध्ये वास्तू शास्त्राच्या 'या' गोष्टी करू नका

पितृ पक्षाला सुरुवात झाली असून पितरांना तृप्त करण्यासाठी तसंच त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पूजा आणि पिंडदान केलं जातं.

पितृपक्षामध्ये वास्तू शास्त्राच्या या गोष्टी करू नका

मुंबई - पितृ पक्षाला सुरुवात झाली असून पितरांना तृप्त करण्यासाठी तसंच त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पूजा आणि पिंडदान केलं जातं. ज्याप्रमाणे आपण ज्योतिष्य शास्त्राची मदत घेतो, त्याचप्रमाणे वास्तू शास्त्र देखील महत्त्वाचं आहे. पितृ पक्षात वास्तू शास्त्रांच्या काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर यामध्ये कोणतीही चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होत असतो. 

पितृ पक्षामध्ये या चुका टाळाव्या -

१) पितृ पक्षामध्ये साधारणपणे आपण पितरांचा फोटो लावतो. मात्र वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरातील ड्रॉईंग रूम किंवा बेडरूममध्ये यांचे फोटो लावू नयेत. असं केल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. 

२) जर तुम्हाला तुमच्या घरात पितरांचा फोटो लावायचा असेल तर तो दक्षिण दिशेला लावावा. ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो, असं मानलं जातं. त्यामुळे जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी फोटो लावला असेल तर वेळीच बदलून घ्या. 

३) पितृ पक्षामध्ये मांसाहारी पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. शास्त्रानुसार याचं कारण म्हणजे, कारण पितृ पक्षाच्या दिवसांत तुमचे पूर्वज पृथ्वीवर येतात. यावेळी आपण त्यांची पूजा करून पिंड दान करतो. अशा स्थितीत तुम्ही मांसाहारी सेवन केल्याने ते अपवित्र होण्याचा धोका असतो. त्यामुळे पितृ पक्षामध्ये नेहमी शाकाहारी अन्न खाऊन पितरांची पूजा करावी. 

(प्रस्तावना - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo