Donate Blood: रक्तदान हे जीवनदान समजले जाते. पण रक्तदानाने केवळ दुसऱ्या व्यक्तीचा जीवच वाचत नाहीतर, दात्यालाही अनेक फायदे होतात. लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, नेहमी रक्तदान करणाऱ्यांमध्ये काही अनुवंशिक बदल होतात, जे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकतात. याशिवाय रक्तदानामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि संपूर्ण शरीर ताजेतवाने राहते.
रक्तदान हे जीव वाचवण्याचे कार्य मानले जाते म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटले जाते. नियमित रक्तदान केवळ रुग्णाचे जीवन वाचवणारे कार्य नाही, तर दात्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. नव्या संशोधनानुसार, नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही सूक्ष्म अनुवंशिक बदल होऊ शकतात, जे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका कमी करतात. हे कसे घडून येते, ते जाणून घेऊ.
हेही वाचा - Noise Cancelling Headphones : नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचा मेंदूच्या क्षमतेवर गंभीर परिणाम? जाणून घ्या, काय आहेत उपाय..
संशोधनात 60-70 वर्षे वयोगटातील दोन गटांचा अभ्यास करण्यात आला. पहिल्या गटाने 40 वर्षे नियमित रक्तदान केले होते, तर दुसऱ्या गटाने केवळ पाच वेळाच रक्तदान केले होते. दोन्ही गटांमध्ये अनुवंशिक उत्परिवर्तनांचे प्रमाण समान होते, पण रक्तदान करणाऱ्यांमध्ये त्याचे स्वरूप निराळे होते.
रक्तदान आणि अनुवंशिक बदल
जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींमध्ये नैसर्गिक उत्परिवर्तन होतात. यालाच ‘क्लोनल हेमेटोपोइसिस’ असे म्हणतात. काही उत्परिवर्तनांमुळे ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) होण्याची शक्यता वाढते. मात्र, संशोधनात आढळले की, नियमित रक्तदान करणाऱ्या लोकांमध्ये होणारे उत्परिवर्तन वेगळ्या स्वरूपाचे असते आणि ते कर्करोगाशी संबंधित नसते.
रक्तदानामुळे स्टेम सेल्स कशा सुधारतात?
संशोधकांचे म्हणणे आहे की, नियमित रक्तदानामुळे शरीरातील रक्त तयार करणाऱ्या प्रणालीला नवीन रक्त पेशी तयार करण्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे स्टेम पेशी अधिक कार्यक्षम होतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आढळले की, रक्तदान करणाऱ्या लोकांच्या स्टेम सेल्स अधिक प्रमाणात आणि अधिक कार्यक्षम रक्तपेशी निर्माण करतात.
दात्याला होणारे रक्तदानाचे इतर आरोग्यदायी फायदे
नियमित रक्तदान केल्याने शरीरातील रक्त नव्याने तयार होते, ज्यामुळे ते अधिक ताजेतवाने आणि निरोगी राहते. रक्तदानामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी देखील रक्तदान फायदेशीर ठरू शकते.
रक्त दाटसर किंवा गुळगुळीत असणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करते. दाटसर रक्तामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. नियमित रक्तदान केल्यास रक्तदाब नियंत्रित राहू शकतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
हेही वाचा - व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता अत्यंत हानिकारक! पण सप्लिमेंटस् योग्य पद्धतीने घेतल्या तरच होईल फायदा
रक्तदानावेळी आरोग्य तपासणी होते
प्रत्येक वेळी रक्तदान करताना दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि नाडीचे परीक्षण केले जाते, तसेच काही ठराविक संक्रामक आजारांची तपासणी केली जाते. त्यामुळे दात्याला त्याच्या आरोग्याबद्दल अद्ययावत माहिती मिळते.
रक्तदान दात्यालाही उपयुक्त आणि निरोगी जीवनशैलीला पूरक
याबाबत संशोधन अजूनही सुरू आहे, त्यामुळे रक्तदान आणि कर्करोगाचा धोका यामधील थेट संबंध सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहे. मात्र, रक्तदान केल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कोणाचे तरी जीवन वाचवू शकते. ही एक जीवनदायी प्रक्रिया आहे, हे रक्तदानाचे सर्वात मोठे कारण असले तरी याने दात्यालाही अगणित फायदे होतात, हे सिद्ध झाले आहे. भविष्यात यावर आणखी संशोधन होत राहील,