Wednesday, June 26, 2024 05:26:49 AM

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा!

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी: कोरोनाची लस आपले कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी खूप मदत केली. मात्र त्यानंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. अनेक मोठ्या मंचांवर तज्ञांनी प्रश्न उपस्थित केला की अचानक येणा-या हृदयविकाराच्या झटक्याला कोविड लस जबाबदार आहे का? पण त्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. आता पुन्हा ही चर्चा वणव्यासारखी पसरत आहे, कारण कोविशील्ड लस बनवणाऱ्या कंपनीने न्यायालयात याची कबुली दिली आहे.

ब्रिटिश फार्मा कंपनी AstraZeneca, कोविशिल्डच्या निर्मात्याने न्यायालयात खुलासा केला की थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसोबतच थ्रोम्बोसिस कोविशील्ड लसीचा दुर्मिळ दुष्परिणाम असू शकतो. जेमी स्कॉट या तक्रारदाराने केलेल्या आरोपानंतर कंपनीने हे मान्य व कबुल केले आहे. या कंपनीची कोविड लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होऊन त्यांच्या मेंदूला कायमची दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री