येवला, ०७ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : मकर संक्रात सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाकरिता बोळक्याची पूजा करण्याची पूर्वीपार परंपरा चालत आली आहे. हे सुगडं (मडके) सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसत आहे. संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात. हे वाण ज्या मातीच्या भांड्यांमधून दिले जाते, ते सुगडं बनविण्यात कारागीरांची लगबग सुरू आहे. येवला तालुक्यात सुगडं मोठ्या प्रमाणात बनवली जात आहेत.