Saturday, September 28, 2024 10:27:58 PM

शुद्ध मध कसा ओळखावा ?

शुद्ध मध कसा ओळखावा

शुद्ध मध कसा ओळखावा ?

१) मध पाण्यात टाका. मध पाण्याची तळाशी जाईल पण पाण्यात विरघळणार नाही
२) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर एका बाजूस टाकून बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजूने फुटून दिसत नाही
३) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत कारण मधात थोडा कडवटपणा असतो

मध खाण्याचे नियम

१) मध गरम करू नये
२) मध अनुकूल पदार्थाबरोबर खावा
३) मास, मासळी यांच्यासोबत मध खाऊ नये
४) पाणी, तूप, लोणी, तेल किंवा रस यांच्या बरोबर खाताना समान प्रामाणात खाऊ नये कोणतीही एक वस्तू जास्त घ्यावी उदा . २ चमचे मध तर तूप वा लोणी ४ चमचे घ्यावे
५) दारू , विडी , सिगारेट वा तंबाखू यांच्या खाण्यानंतर मध खाऊ नये .
६) तापात किंवा अत्यंत तहानेच्या वेळी नुसता मध खाऊ नये . पाणी वा रसात मिसळून खावा .
७) साखरेत मिसळून खाऊ नये कारण ती बनवताना वापरलेली रसायने बाधक ठरतात .
८) मोठया माणसांनी एकावेळी दहा ग्रॅम पेक्षा जास्त मध खाऊ नये लहानांना अर्धाभाग अति लहानांना पाव भाग मध द्यावा.
९) थंडीत गरम दूध वा पाण्यातून तर उन्हाळयात सरबतातून, पावसाळयात नुसताच मध खावा

मधातील घटक दव्ये

१) द्राक्षे , ऊस व फळातील शर्करा यांच्याप्रमाणे मधातील शर्करा ही अमृता समान
२) शारीरिक पोषणास आवश्यक कॅल्शियम आदी घटक द्रव्ये १२ टक्के
३) प्रोटिन, व्हिटॅमिन चरबी इत्यादी तत्व भरपूर प्रमाणात
४) मधाच्या एका चमच्यात ७५ कॅलरी

        

सम्बन्धित सामग्री