Sunday, October 06, 2024 03:16:40 AM

godavari-river-again-in-the-grip-of-pollution
गोदावरी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

गोदावरी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

गोदावरी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात  नाशिक २६ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाढल्या आहेत. दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य पुन्हा या पानवेलींमुळे धोक्यात आले आहे. गोदावरी नदीत एवढ्या पानवेली वाढल्या आहेत की नदीच पात्र ओळखणे अवघड झालं आहे. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी देशभरातील लाखो भावीक येत असतात. तसेच नाशिकच्या गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून देखील ओळखले जाते परंतु आता याच गोदावरी नदीचे पवित्र सततच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. गोदावरी पात्रामध्ये सांडपाणी सोडण्यात येतं, तसेच गोदावरी नदीच्या आजुबाजूस असलेल्या काही कंपन्यामधूनही दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत येत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. नाशिकची गोदावरी नदी सध्या पानवेलीने झाकलेली पाहायला मिळते. प्रशासनाने येत्या कुंभमेळ्याचे नियोजनासाठी सर्व तयारी केली आहे. पण आधी गोदावरीला पानवेलीतून मुक्त करावे, अशी मागणी नाशिककर करू लागले आहेत.


सम्बन्धित सामग्री