Sunday, July 07, 2024 12:31:23 AM

satpura-waterfall-is-attracting-tourists
सातपुडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय

सातपुडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय

पावसाळा आला की आपल्याला आठवतो तो धबधबा! प्रेम, चहा, भजी आणि धबधबा! आपली इच्छा होते की आपण मस्त एखाद्या धबधब्याखाली जाऊन मजा करावी, पाण्याचा आनंद घ्यावा. मग शोध सुरु होतो, कुठे जायचं फिरायला? भारतात अशी अनेक अनेक ठिकाणं आहेत. भारत विविधतेने नटलेला देश आहे ज्यात फक्त संस्कृतीतच विविधता नाही तर निसर्गात सुद्धा विविधता आहे. दऱ्या, ओढे, नद्या, पूल, धबधबे या सर्व गोष्टी सौंदर्यात भर घालतात. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची बरसात होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत.

सातपुड्यातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. धुळ्यात यंदा उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे धबधबे देखील उशिरा प्रवाहित झाले. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रवाहित होणाऱ्या नवादेवी धबधबा यंदा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवाहित झाला. हा धबधबा धोकादायक नसल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

           

सम्बन्धित सामग्री