Wednesday, September 18, 2024 06:05:35 AM

'Constitution Awakening' Nagpur News
संविधान जागर' चा विचार सर्वदूर रुजेल आणि जिंकेल : ॲड. धर्मपाल मेश्राम

संविधान जागर यात्रा काँग्रेसच्या दांभिकपणावर जोरदार प्रहार करेल. काँग्रेसकडून संविधानाची चुकीची माहिती देण्यात आली असून, त्याचे खरे स्वरूप लोकांसमोर येईल.

संविधान जागर चा विचार सर्वदूर रुजेल आणि जिंकेल  ॲड धर्मपाल मेश्राम

नागपूर : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा राज्यभर काढण्यात येत आहे. ही यात्रा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केलेल्या भूमीवरून ९ ऑगस्ट रोजी सुरू झाली. नागपूर शहरात याच यात्रेचा आगमन ३० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात झाला.

भीम चौक येथे झालेल्या जंगी स्वागत समारंभानंतर बाबू हरदासजी आवळे चौक येथे भव्य जाहीर सभा झाली. संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी प्रमुख भाषण केले. त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवताना म्हटले की, "संविधान जागर यात्रा काँग्रेसच्या दांभिकपणावर जोरदार प्रहार करेल. काँग्रेसकडून संविधानाची चुकीची माहिती देण्यात आली असून, त्याचे खरे स्वरूप लोकांसमोर येईल."

ॲड. मेश्राम यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वावर टीका करताना असे म्हटले की, "काँग्रेस स्वतःच्या पिढीच्या राजकीय भवितव्यासाठी संविधानाच्या प्रस्ताविकेत बदल करत आहे. इंदिरा गांधीने ४२वी घटना दुरुस्ती करून संविधानाचा आधारच बदलला. त्याआधी पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना लोकसभेत पोहोचण्यापासून अडथळा आणला."

त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की, "मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून संविधानाचा सन्मान केला." काँग्रेसने लॅटरल एन्ट्रीच्या नावावर देशावर अनेक बोगस लादल्याची टीका करताना मेश्राम यांनी उल्लेख केला की, नागपूरात एक माजी सनदी अधिकारी दिशाभूल करणारे आंदोलन करत होता. परंतु आंबेडकरी जनता आता जागरूक झाली आहे आणि काँग्रेसच्या भ्रामक बतावणीला बळी पडणार नाही.
 


सम्बन्धित सामग्री