Tuesday, September 17, 2024 09:07:00 AM

Dahi Handi
युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरिय दहीहंडी

मागील पंधरा वर्षांपासून मेळघाटचे आकर्षण असलेली युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरिय दहीहंडी यंदा धारणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात झाली.

युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरिय दहीहंडी

मेळघाट : मागील पंधरा वर्षांपासून मेळघाटचे आकर्षण असलेली युवा स्वाभिमान पार्टीची विदर्भस्तरिय दहीहंडी यंदा धारणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात झाली. हजारो आदिवासींच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा झाला. उत्सवाच्या निमित्ताने एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत सिनेसृष्टीत खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोव्हर, माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे सहभागी झाले होते. मिरवणुकीला दुतर्फा उभे राहून हजारो मेळघाटवासियांनी मान्यवरांचे स्वागत केले. 

नवनीत राणा आणि रवि राणा यांनी भ्रष्टाचाराची हंडी फोडून आदिवासींचा पैसा कोणालाही खाऊ देणार नाही, असे सांगितले. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी नृत्य स्पर्धा झाली. मेळघाटातील सामाजिक कार्यकत्यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा आणि माजी आमदार केवलराम काळे यांनी सत्कार केला. 

दहीहंडी उत्सवात बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी अचलपूर जिल्हा निर्मितीचा संकल्प केला. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींवर उपचार केले जातील, असे नवनीत राणांनी सांगितले. अमरावती ते परतवाडा ते धारणी ते खंडवा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या. मेळघाटामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून काम करणात्या आदिवासी कामगारांचा पगार २७५ रुपयांवरुन वाढवून ६०० रुपये करू आणि सरकारच्या योजनेंतर्गत आदिवासींना हक्काचे घर उपलब्ध करुन देऊ, असेही आश्वासन नवनीत राणांनी दिले. 


सम्बन्धित सामग्री