Saturday, September 28, 2024 03:54:54 PM

Mumbai University Senate Elections
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा 8 जागांवर विजय

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा मिळवला आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा  8 जागांवर विजय

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा मिळवला आहे. युवासेनेच्या राखीव मतदारसंघातील पाचही उमेदवार भरघोस मते घेऊन विजयी झाले आहेत. शशिकांत झोरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ज्यामुळे सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

युवासेनेने आतापर्यंत 10 पैकी 8 जागा जिंकल्या असून, यामध्ये शशिकांत झोरे (DTNT प्रवर्ग) 5247 मते, शीतल शेठ-देवरुखकर (SC प्रवर्ग) 5489 मते, धनराज कोहचाडे (ST प्रवर्ग) 5247 मते, मयूर पांचाळ (OBC प्रवर्ग) 5350 मते, आणि स्नेहा गवळी (महिला प्रवर्ग) 5914 मते घेऊन विजयी झाले आहेत.

खुला प्रवर्गात, प्रदीप बाळकृष्ण सावंत यांनी 1338 पहिल्या पसंतीची मते मिळवून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. मिलिंद साटम (1246 मते) आणि अ‍ॅड. अल्पेश भोईर (1137 मते) देखील विजयी झाले आहेत.

युवासेनेच्या पाचही उमेदवारांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत दणदणीत विजय मिळवला आहे. युवासेनेने अनेक वर्ष सिनेट निवडणुकांमध्ये प्राबल्य राखलं आहे.  


सम्बन्धित सामग्री