Saturday, September 28, 2024 03:50:51 PM

Written letter from police to SUBT MLA Naik
आमदार वैभव नाईक यांना पुतळा प्रकरणात पोलिसांचे लेखी पत्र

शिउबाठाचे आमदार वैभव नाईक यांना राजकोट पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपास कामी आवश्यक माहिती चार दिवसात मिळवण्याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांनी लेखी पत्र दिले आहे.

आमदार वैभव नाईक यांना पुतळा प्रकरणात पोलिसांचे लेखी पत्र 

सिंधुदुर्ग : शिउबाठाचे आमदार वैभव नाईक यांना राजकोट पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपास कामी आवश्यक माहिती चार दिवसात मिळवण्याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांनी लेखी पत्र दिले आहे. राजकोट पुतळा प्रकरणी शासनाला जो तेरा पानी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.  

नव्याने वीस कोटी खर्चाच्या निविदा राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली आहे. यातील मुदत ही केवळ सहा महिन्याची आहे. त्यामुळे घाई गडबड केवळ विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने केल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. ज्याच्या सांगण्यावरून मला पोलिसांनी पत्र दिलं त्यांच्यावर माझा आरोप आहे. संवेदनशील विषयात पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणं गरजेचं होतं. पहिल्यापासून पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला हे आरोप तेव्हाही होते आणि आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचाराबाबत माहिती समोर आणत असल्याने पोलीस आम्हाला नोटीस बजावत आहेत. जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही चौकशी केली नाही. असे शिउबाठा आमदार नाईक यांनी म्हटले आहे.  

अहवालात स्पष्ट नमूद केलं की महाराजांचा पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला हे समोर आलं आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारला तर त्यांचं बिल अदा का करण्यात आलं. अहवाल सादर केला तो खरा असेल तर पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. जयदीप आपटे याचं स्टेटमेंट बाहेर आलं तर दोषी कोण आहेत हे समोर येईल असेही आमदार नाईक यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक चांगलं व्हावं यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याची सहा महिन्यात  निविदा प्रक्रिया सुरू झाली. तज्ञ मंडळी याच्या माहितीनुसार मोठा पुतळा उभारण्यासाठी दोन वर्ष जातात. मात्र सरकार एवढी घाई गडबड का करतेय. निविदा आधीच कुणाला द्यायचं ठरवून ही निविदा प्रसिद्ध केली. तसेच सरकारचा रोष कमी करण्यासाठी ही निविदा प्रसिद्ध केली आहे असे त्यांनी माध्यमांना सांगितले.   


सम्बन्धित सामग्री